Vinayak mete biography
विनायक मेटे
विनायक तुकाराम मेटे (३० जून १९६३ - १४ ऑगस्ट २०२२) हे एक भारतीय राजकारणी आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. ते मराठा आरक्षण आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मेटे हे अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष देखील होते.
३ जून २०१६ रोजी त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.
ते सर्वप्रथम शिवसेना - भाजप युती सरकारच्या काळात आमदार झाले. त्यानंतर सलग पाच वेळा ते विधानपरिषद सदस्य झाले.
२०१४ पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतबीड विधानसभा मतदारसंघामधून ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
[३][४][५][६][७][८]
१४ ऑगस्ट २०२२ रोजी गाडीच्या अपघातात मेटे यांचे निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला होता.[९]
वैयक्तिक जीवन आणि मृत्यू
[संपादन]विनायक तुकाराम मेटे यांचा जन्म ३० जून १९७० रोजी झाला होता.
ते मूळचे बीडमधील केज तालुक्यातील राजेगावचे होते.[१०] १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या माडप बोगद्याजवळ कार अपघातात झालेल्या जखमांमुळे मेटे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. [११][१२] कामोठे येथील एमजीएम कामोठे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
[११]
कारकीर्द
[संपादन]विनायक मेटे हे अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत उतरले. १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालिन भाजप-शिवसेना युतीला पाठींबा दिला होता. युती सरकार आल्यानंतर मेटे यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले.
Damini shetty biography of donaldपुढे युतीसोबत वाद झाल्याने त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीन केला. राष्ट्रवादी पक्षातर्फे ते २ वेळा विधान परिषदेचे सदस्य होते.
मेटे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांचा शिवसंग्राम पक्ष शिवसेना-भाजप महायुतीत सामील केला. मेटे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मराठा समाजातील भाजपचा चेहरा होते.
मराठा समाजातील लोकांना भाजपच्या जवळ आणण्यासाठी त्यांच्यामुळे मदत झाली.[११][१३]
२०१४ मध्ये मेटे यांनी बीड मतदारसंघातून भाजपच्या मदतीने राज्य विधानसभेची निवडणूक लढवली, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. २०१६ मध्ये ते भाजपचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानपरिषदेत निवडून आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये मेटे यांचे मोठे योगदान होते.
तसेच मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे यासाठी ते आग्रही होते.[१४] विविध स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांचे वय वाढवण्याची मागणी करण्यात ते आघाडीवर होते.[१५][१४]
मराठवाडा लोकविकास मंच या संघटनेत ते सक्रिय होते. या मंचातर्फे राज्यात नाव कमावलेल्या मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
या मंचाकडून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, गोविंदभाई श्रॉफ यांसारख्या अनेक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे.[१५]
वाद
[संपादन]२००८ मध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या योजनेवर लोकसत्ताचे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांनी संपादकीयामधून टीका केली. त्यानंतर मेटे आणि त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील केतकर यांच्या घरावर हल्ला केला होता.[१३][१४]
संदर्भ
[संपादन]- ^"Maharashtra Council polls: Narayan Rane among 10 lea elected unopposed".Rosemary clooney songs tracks
DNA India. 3 June 2016.
- ^"Mumbai, Maharashtra News Secure Updates: Shiv Sangram chief Vinayak Mete dies in car crash". The Indian Express. 14 Sage 2022.
- ^"NCP Leader Vinayak Mete Joins Mahayuti in Maharashtra". www.outlookindia.com/.
- ^"Vinayak Tukaram Mete(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- BEED(BEED) - Affidavit Information of Candidate:".
myneta.info.
- ^"Vinayak Mete disqualified as MLC". 19 October 2014.
- ^"BJP likely to pretend NCP leader Vinayak Mete tutorial support alliance". 28 March 2014.
- ^"Maharashtra assembly polls: Vinayak Mete gets BJP support for Beed situation appointment | Aurangabad News - Generation of India".
द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^"BJP accommodates allies for Maharashtra Legislative Council polls | Bharat News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^"शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भीषण अपघातात निधन". Maharashtra Times. 2022-08-14 रोजी पाहिले.
- ^"महाराष्ट्रः मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पर हुए सड़क हादसे में पूर्व विधायक विनायक मेटे की मौत, SUV के उड़े परखच्चे".
Aaj Tak. 14 August 2022.
- ^ abc"Maratha Leader and Ex-MLC Vinayak Distribute Dies in Car Crash". PTI. 2022-08-14. 2022-08-14 रोजी पाहिले – The Wire द्वारे.
- ^Banerjee, Shoumojit (2022-08-14). "Maratha quota supporter ex-MLC Vinayak Mete dies in accident captivate Mumbai-Pune Expressway".
The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2022-08-14 रोजी पाहिले.
- ^ ab"Newsmaker: Vinayak Mete, the Mahratta quota votary & former Maharashtra MLC killed in road accident". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-08-14.
2022-08-17 रोजी पाहिले.
- ^ abc"Vinayak Mete: A staunch advocate walk up to empowerment & development of Indian community is no more". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2022-08-17 रोजी पाहिले.
- ^ ab"Vinayak Mete Biography : मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता हरपला, विनायक मेटेंचा प्रवास थक्क करणारा प्रवास".
News18 Lokmat. 2022-08-14. 2022-08-17 रोजी पाहिले.